अहमदाबाद : गुजरातमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलाने ठार केले. बीएसएफने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री बनासकांठा येथे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा कुंपणाकडे जाणार्या एका संशयास्पद व्यक्तीला जवानांनी पाहिले. त्यांनी घुसखोराला थांबण्यास सांगितले; मात्र, तो पुढे जात राहिला. त्यानंतर सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात घुसखोर जागीच मृत्यू झाला. या घुसखोराची ओळख किंवा घुसखोरीच्या प्रयत्नामागील हेतू काय होता? या संदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Fans
Followers